विदर्भ आविस अध्यक्षाची अप्पर आयुक्ताकडे वसतिगृह सुरू करण्यासाठी निवेदन

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,
Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची: आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भाचे अध्यक्ष शिवकुमार कोकोडे यांनी नागपूर येथील अप्पर आयुक्त नागपूर विभाग रविंद्र ठाकरे यांना वसतिगृह सुरू करण्यासाठी गुरुवारी निवेदन देण्यात आले. यावेळी आविस तथा गोटूल सेना प्रमुख महाराष्ट्र मुकेश नरोटे, कोटगुल येथील विलास उईके व नरोटे उपस्थित होते.

          गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, वडसा व बहुतेक जिल्ह्यातील वस्तीगृह अजूनही सुरू होण्यास आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विचार करता लवकरात लवकर वसतीगृह सुरू करण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांची डीबीटी लवकरात लवकर देण्यात यावी, शासकीय आश्रम शाळेत कर्मचार्‍यांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडथळे निर्माण होत आहेत.

          कोरची शासकीय आश्रम शाळेत पूर्णवेळ शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच कोरची येथील बांधण्यात आलेली नवीन इमारत लवकरात लवकर सुरू करणे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक न्याय देण्याबाबतची तसेच आणखी काही शैक्षणिक समस्या सोडवूनकी बाबतची या निवेदनातून अप्पर आयुक्तांकडे मागणी करण्यात आलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.