कोरची : येथील नंदनवन कॉलनी वार्ड क्रमांक 2 येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्रथम वर्षी सार्वजनिक गणेश मंडळाची प्रतिष्ठापना करून जनजागृतीचे कार्य केले जात आहे.
जनजागृती करिता प्रामुख्याने चार ते पाच मुद्दे घेऊन मंडळाने बॅनरच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे ठरविले असून, त्यांनी झाडे लावा- झाडे जगवा, स्त्री-भ्रूण हत्या, ओला व सुका कचरा, सर्व धर्म समभाव, व्यसनमुक्ती, इत्यादी विषयावर जनजागृती करीत आहे.
या मंडळाने सर्वधर्मसमभाव या भावनेने दररोज मोठ्या उत्साहाने सामुहिक आरती करण्याचे ठरविले असून सर्व धर्माचे लोक या आरतीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून लगेच हरिपाठ सर्व मिळून केले जाते. तसेच दररोज सामूहिकरीत्या विविध खेळाचे व स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये संगीत खुर्ची, चमच्या गोळी स्पर्धा, टीकली लावणे स्पर्धा, फुगे फोड, गीत गायन, अंताक्षरी, हांडी फोड, जिलेबी तोड, एकल नृत्यस्पर्धा, इत्यादी स्पर्धेचे आयोजन करून प्रथम द्वितीय असे पारितोषिक देण्याचे ठरविण्यात आले असून यामध्ये संपूर्ण पुरुष- महिला व बाल गोपाल मोठा उत्साहाने भाग घेत आहे.
नंदनवन कॉलनी येथील गणेश उत्सव हा सध्या कोरचीसाठी चर्चेचा विषय बनला असून कोरची तालुक्यातील राजकीय पक्षाचे नेते तथा पदअधिकारी ,व कोरची येथील रहिवासी, कर्मचारीवर्ग या मंडळाला भेट देत असून सर्वत्र या मंडळाची प्रशंसा करीत असून आदर्श कॉलनी म्हणून संबोधित केल्या जात आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे या वर्षी प्रथम वर्ष असून त्यांनी जनजागृतीचे कार्य करीत असून पुढील वर्षी सुद्धा या पेक्षा मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात येईल अशी ग्वाही मंडळाचे अध्यक्ष सुरज दिलीप हेमके यांनी दिली आहे.
सदर गणेशोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सुरज हेमके , भूमेश्वर गावतुरे, प्रीतम वैद्य, दिनेश बोरकुटे, प्रकाश उईके, राजू हुकरे, जोहितराम बक्कर ,डोमाजी साहाळा ,राजेंद्र मस्के, नरेश रामटेके, भरत नैताम ,चतुर सिंद्राम ,खुशाल सुरसावंत, दिलीप सान्सुरवार ,महेश सोरी ,बलदेव बागडेरिया ,किशोर सहारे ,नितिन पंडित , परशूराम मडावी ,अमर बोलकुंटवार ,भय्या मारवाडे ,संजय बोकडे ,विनोद कोरेटी इत्यादी चे सहकार्य लाभले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.