कोविड-19 च्या काळात आशांची उत्कृष्ट कामगिरी; कोरची तालुका आशा पुरस्कार सोहळा साजरा | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची
: कोविड-19 आशा पुरस्कार सोहळ्याचे औचित्य साधून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कोरची व यूनिसेफ च्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कोविड-19 आशा पुरस्कार सोहळा गुरुवारी गोटूल भवन येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये, प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद मडावी, बोटेकसा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रणव लेपसे, कोरची नायब तहसीलदार बोदेले, युनिसेफ कन्सल्टंट डॉक्टर प्रेरणा राऊत, क्षयरोग अधिकारी डॉक्टर गोरे सर, सलोटे सर, डीसीएम रचना फुलझेले, सिकलसेल कोऑर्डिनेटर अश्विनी मेंढे, गडचिरोली मातृवंदना योजना व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कोविड-19 महामारी च्या काळात आशा वर्कर यांनी आपल्या गावातील लोकांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण करण्यास सहकार्य केले, त्यामध्ये ज्यांनी आपल्या गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यास सहकार्य केले अशा तालुक्यातून तिन आशांची निवड प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने करण्यात आली. या मधील प्रथम क्रमांकावर आशा कचरीबाई सहारे, द्वितीय क्रमांकावर आशा रेखा नरोटे, तृतीय क्रमांकावर आशा शांती बोगा या तिघींना संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद मडावी यांच्या हस्ते सायकल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सुद्धा उत्कृष्ट काम केलेल्या कोलते सिस्टर आशा वर्कर अनिता सयाम, रविता कोरचा आशा कार्यकर्ती यांचा सत्कार करण्यात आले, मातृ वंदना योजनेत ज्यांनी उत्कृष्ट कार्य केला अशा तीन आशा कार्यकर्ती सुनंदा सोमाजी गावडे, पदमा जयदेव मेश्राम, आस्माय घासीराम तुलावी यांना प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आली तसेच महागाव येथील आशा वर्कर लक्ष्मी काटेंगे हिला एका मातेचे व बालकाचे जीव वाचवण्यात मोलाचे सहकार्य केले त्यामुळे तालुका समूह संघटक पवन बन्सोड यांनी प्रोत्साहनपर बक्षीस दिले.
कोविड-19 लसीकरण दोन्ही प्रोज पूर्ण करण्यास सर्व आशाने सहकार्य केल्याबद्दल टिफिन डबे देऊन सर्वांचे सन्मान करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद मडावी संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये यांनी सुरु असलेल्या कोंबडी लसीकरण गोष्ट दोष बद्दल पूर्ण करणे व नागरिकांच्या घराघरात जाऊन बुस्टर डोज लावून बुस्टर डोज चा लक्ष पूर्ण करण्यास सांगितले. यावेळी कार्यालयातील बीसीएम पवन बन्सोड, एमटीएस अनिकेत भांडारकर, एस ए रमेश मांदेलवार, पी ए दिनेश अंबादे, लेखापाल सचिन कोमरेल्लीवार उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे संचालन आय एफ एम विकास लाडे, आभार एसटीएस प्रमोद सातपुते यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक सहकार्य यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.