Gosikhurd Flood Live Updates (16 Aug) : 16 ऑगस्ट 22, रात्री 08.00 वा. गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात वाढविण्यात आला आहें. गोसेखुर्द धरणाचे 21 गेट 03 मीटरने तर 12 गेट 02.5 मीटरने उघडण्यात आले असून 17161.25 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
- हेही वाचा : वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
- हेही वाचा : ब्रम्हपुरी | लाडज गाव पुन्हा जलमय!
- हेही वाचा : ब्रम्हपुरी: पिपंळगाव भोसले येथील पूरस्थिती
- गोसीखुर्द धरणातुन 17145 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु ( 8/16/22 3:00 PM )
16 ऑगस्ट 22, दुपारी 03.00 वा. गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात वाढविण्यात आला आहें. गोसेखुर्द धरणाचे 21 गेट 03 मीटरने तर 12 गेट 02.5 मीटरने उघडण्यात आले असून 17145.1 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
- गोसीखुर्द धरणातुन 18000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात होईल, भंडारा शहरातील 30% भागात पुराचे पाणी (8/16/22 11:30 AM ) :
गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात वाढलेला आहें. वैनगंगा नदीतील पूराचे पाणी भंडारा शहरातील 30% भागात शिरले आहे. तरी आता धरणाचा विसर्ग वाढविणे हा एकमात्र पर्याय उपलब्ध आहे. याकरीता येत्या पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 18000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहा.
- गोसीखुर्द धरणातुन 15216 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, धरणाचे 33 गेट 2.5 मीटरने उघडले (8/16/22 8:58 AM ) :
16 ऑगस्ट 22, सकाळी 8.00 वा. गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात वाढविण्यात आला आहें. गोसेखुर्द धरणाचे 33 गेट 2.5 मीटरने उघडण्यात आले असून 15216.3 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सतर्कतेचा ईशारा:
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मागील 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील नदी व नाले मोठ्या प्रमाणात भरून वाहत आहेत. अनेक रस्ते बंद झालेले आहेत. तरी वैनगंगा नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे - प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.
कृपया प्रशासन मार्फत दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन करावे. सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
Gosikhurd National Project (GSK)
Date : 16-08-2022, @08:00
Gate Position: 33 Gate Open By 2.5m.
- Spillway : 15216.3 m³/sec
- PH : Close.
- RBC PH : Close.
Total Discharge : 15216.3 m³/sec
- For Irrigation :
- RBC : Close.
- LBC : Close.