ब्रम्हपुरी: पिंपळगाव भोंसले गावाला दुसऱ्यांदा महापुराचा वेढा, पूरस्थिती कडे प्रशासनाचे दुलर्क्ष | BatmiExpress™

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Flood,Bramhapuri Live,Chandrapur Flood,Floods,Bramhapuri News,

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri Flood,Chandrapur,Chandrapur Flood,Bramhapuri News,Floods,Chandrapur News,

ब्रम्हपुरी: तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव पिंपळगाव हे गांव असून त्यांचा मुख्य पीक भात पीक व सोयाबीन आहे. यावर्षी लागोपाठ दुसऱ्यांदा या गावाला महापुराने वेढा घातलेला आहे. पुरामुळे गावातील जनतेचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. मोठ्या प्रमाणावर भात पिकांची नुकसान झालेली आहे. त्याचप्रमाणे अन्य पूरक पिके देखील उद्ध्वस्त झालेली आहेत. वारंवार बाह्य संपर्क तुटत असल्यामुळे गावातील जनतेला गावाबाहेरची कामे करायला अडचण निर्माण झालेली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा बुडत आहे. शासकीय कर्मचारी गावात येऊ शकत नाही. त्यामुळे पिंपळगाव हे गाव मुख्य प्रवाहापासून दूर जात आहे. पिंपळगावांला दरवर्षी पूराचा फटका सहन करावा लागत असतो. 

पिंपळगाव भोसले या पूरग्रस्त गावाला विशेष आर्थिक पॅकेज तात्काळ देण्यात यावा- पिंपळगाव ग्रामसस्थानची मागणी. - अविनाश कडूकर ( ग्रामस्थ - पिपंळगाव भोसले )

आत्तापर्यंत जीवित हानी झाली एकाच घर पडलेल त्यात एका व्यक्तीच निंधन झाल आणी पिंपळगाव वासींयाच भात पिकांचे व अन्य पिकांची नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्याचप्रमाणे शेतीची अवजारे देखील वाहून गेल्याची शक्यता आहे. वारंवार येणाऱ्या पुरामुळे गावकरी हताश झालेले आहेत. शेत पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेली असून गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

पिंपळगावाला पूरग्रस्त/ पूरबाधित गांव म्हणून घोषित करून पिंपळगावासाठी शासनाने मदतीचा विशेष आर्थिक पॅकेज तात्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी अशी मागणी पिंपळगाव वासीयांनी केलेली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.