ब्रम्हपुरी: तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव अ-हेरनवरगाव हे गांव असून त्यांचा मुख्य पीक भात पीक व सोयाबीन आहे. यावर्षी लागोपाठ एका आठवड्यात दुसऱ्यांदा या गावाला महापुराने वेढा घातलेला आहे. पुरामुळे गावातील जनतेचे जीवनमान विस्कळीत झालेले आहे. मोठ्या प्रमाणावर भात पिकांची नुकसान झालेली आहे. त्याचप्रमाणे अन्य पूरक पिके देखील उद्ध्वस्त झालेली आहेत. वारंवार बाह्य संपर्क तुटत असल्यामुळे गावातील जनतेला गावाबाहेरची कामे करायला अडचण निर्माण झालेली आहे. शासकीय कर्मचारी गावात येऊ शकत नाही. त्यामुळे अ-हेरनवरगाव हे गाव मुख्य प्रवाहापासून दूर जात आहे. अ-हेरनवरगाव ला दरवर्षी पूराचा फटका सहन करावा लागत असतो.
अ-हेरनवरगाव या पूरग्रस्त गावाला विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावा. अशी अ-हेरनवरगाव ग्रामसस्थानची मागणी
आत्तापर्यंत जीवित हानी झाली नाही परंतु पाण्यात जिवाला धोक्यात घालून घरचे सर्व आवश्यकता नुसार सामान नेत आहेत. गावात बाझार चौक खालच्या भागाला असल्यामुळे बाजारातील सर्व घर तसेच बाजारातील सर्व दुकाने हे सर्व पुराच्या विळख्यात आले. आणि या सततच्या पुराने बाजारातील सर्व लोकं निराश झाले आहेत.
अ-हेरनवरगाव वासींयाच भात पिकांचे व अन्य पिकांची नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्याचप्रमाणे शेतीची अवजारे देखील वाहून गेल्याची शक्यता आहे. वारंवार येणाऱ्या पुरामुळे गावकरी हताश झालेले आहेत. शेत पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेली असून गावातील जनता हवालदिल झालेली आहे.
अ-हेरनवरगाव पूरग्रस्त/ पूरबाधित गांव म्हणून घोषित करून अ-हेरनवरगाव साठी शासनाने मदतीचा विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून आर्थिक मदत करावी अशी मागणी अ-हेरनवरगाव वासीयांनी केलेली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.