Sanjay Raut: मोठी बातमी! संजय राऊत अखेर ईडीच्या ताब्यात - BatmiExpress™

ED News,Sanjay Raut,Sanjay Raut ED,Sanjay Raut ED Live Updates,Mumbai,Mumbai News,Mumbai Live,live mumbai news,latest mumbai news,mumbai news today,
ED News,Sanjay Raut,Sanjay Raut ED,Sanjay Raut ED Live Updates,Mumbai,Mumbai News,Mumbai Live,live mumbai news,latest mumbai news,mumbai news today,

मुंबई:- पत्राचाळ प्रकरणात टांगती तलवार असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना नऊ तासाच्या चौकशीनंतर अखेर आज ईडीकडून ताब्यात ( 

Sanjay Raut ED

 ) घेण्यात आले आहे. राऊतांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं होतं. ( 

Sanjay Raut ED Live Updates

 )
दरम्यान, भांडुप येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी ईडीचे अधिकारी आले होते. सकाळपासून आत्तापर्यंत त्यांची कसून चौकशी चालू होती. यादरम्यान त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली होती. त्यानंतर, "पण तरीही मी शिवसेना सोडणार नाही." असं ट्वीट संजय राऊतांनी केलं होतं. दरम्यान राऊतांच्या घरी सीआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पण अखेर नऊ तासाच्या चौकशीनंतर राऊतांना ईडीकडून ताब्यात ( 

Sanjay Raut ED

 ) घेण्यात आलं आहे. त्यांना आता ईडीचे अधिकारी ईडी कार्यालयात घेऊन जात आहे. पुढची कारवाई आता ईडी कार्यालयात होईल. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.