नागभीड:- तालुक्यात संतत मुसळधार पावसामुळे ब्रिटिश कालीन घोडाझरी तलाव ( British-Kalani Ghodazari Lake ) ओव्हरफ्लो झाला. घोडाझरी तलावाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी संपूर्ण विदर्भातून पर्यटक या ठिकाणी येत आहेत. परंतु दि. 28 जुलैला नागभीड तालुक्यातील चिंधचक येथील इसम घोडाझरी तलावाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी गेला होता. घोडाझरी तलावाच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे घोडाझरी तलाव प्रत्येक रविवारी व 15 आगस्टला येथील प्रवेश बंद असणार आहे.
- प्रत्येक रविवारी - प्रवेश बंद
- 15 आगस्ट 2022 - प्रवेश बंद
रविवारला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे अनेक पर्यटक घोडाझरी तलावाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी येत असतात. अशातच 15 आगस्ट दिन साजरा करून अनेक पर्यटक , विद्यार्थी आणि इतर या ठिकाणी येत असतात.
प्रत्येक रविवार आणि 15 आगस्टला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होत असते. 28 जुलैला झालेल्या घटनेमुळे प्रत्येक रविवारी व 15 आगस्टला प्रवेश बंद असणार अशी सूचना घोडाझरी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.