नागभीड:- संतत मुसळधार पावसामुळे जिह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील नागभीड तालुका मधील ब्रिटिश कालीन घोडाझरी तलाव ( British-Kalani Ghodazari Lake ) ओव्हरफ्लो झाला. घोडाझरी तलावाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी संपूर्ण विदर्भातून पर्यटक या ठिकाणी येत आहेत. अश्यातच दि. 28 जुलैला नागभीड तालुक्यातील चिंधचक येथील इसम पर्यटनासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सदर इसमाचे नाव मधुकर कामडी वय (45) वर्ष रा. चिंधीचक येथील रहिवासी आहे. सदर घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी मृतदेहाला बाहेर काढले व घटनेची माहिती वनविभाग व पोलीस विभाग यांना देण्यात आली. पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे.
Nagbhid:- Due to continuous heavy rains there was flood situation in the district. The British-era Ghodazari lake in Nagbhid taluka of the district overflowed. Tourists from all over Vidarbha are coming to this place to enjoy Ghodazari lake. In this way On July 28, Isam drowned in Chindchak in Nagbhid taluk while going for tourism.
Said Isma Name Madhukar Kamdi Age (45) Year Res. A resident of Chindhichak.
As soon as the family members got the information about the incident, they took out the dead body and the information about the incident was given to the forest department and the police department. Further investigation is being done by the police department.