'
30 seconds remaining
Skip Ad >

गोंदिया : 4 जिवलग मित्रांचा कार अपघातात झाला दुर्देवी मृत्यू - BatmiExpress™

0

Gondia Accident,Gondia,Gondia Live News,Gondia Marathi News,gondia news,Accident,Accident News,

गोंदिया ( 
Gondia Accident ): कशाशीही तुलना करता येत नाही अशी ती मैत्री. मैत्रीत अनेक जण शेवटपर्यंत एकत्र राहणयाच्या आणाभाका घेतात. पण मैत्री अखेरपर्यंत निभावणारे हे मोजकेच असतात. अशाच जिगरी आणि जिवाभावाच्या 4 मित्रांचा कार अपघातात ( Car Accident ) दुर्देवी मृत्यू झालाय. तर एकावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे. अपघाताची ही घटना विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात घडली.जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खोबा गावाजवळ हा अपघात झालाय. हे 4 मृत तरूण हे आमगाव तालुक्यातील असल्याची माहिती आहे. हे 5 मित्र नवेगावबांध इथे सोलर पंप फिटिंगच काम करण्यासाठी गेले होते.हे काम पूर्ण करुन परतत असताना घात झाला.

परतताना गाडी चालवणाऱ्या तरुणाचा ताबा सुटला. कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरून खाली कोसळली. यात 4 मिंत्रांचा जागीच मृत्यू झाला. तर यातील गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच वेळी 4 मित्रांचा मृत्यू झाल्या महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला 4 मित्र आपल्याला सोडून गेल्याचा जोरदार धक्का हा अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला बसला आहे.रामकृष्ण बिसेन (24 वर्ष), सचिन कटरे (24 वर्ष), संदीप सोनवण (18 वर्ष) आणि निलेश तुरकर (27 वर्ष) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर प्रदीप बिसेन वर (24 वर्ष) उपचार सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×