Weather Alert: हवामान विभागाकडून आज नागपूर आणि जवळील जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी - Batmi Express

Nagpur,nagpur news,Nagpur Today,Nagpur Weather,Wardha,Bhandara,Gondia,Amravati,Akola,Yavatmal,Buldana,Washim,

Nagpur,nagpur news,Nagpur Today,Nagpur Weather,Wardha,Bhandara,Gondia,Amravati,Akola,Yavatmal,Buldana,Washim,

नागपूर
: मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा मुसळधार मान्सून सरी आणि गारपीट पडण्यास सुरवात झाली आहे. राज्याच्या दुसऱ्या राजधानीत नागपूर मध्ये पुन्हा पाऊस परत येण्याची शक्यता आहे.  हवामान विभागाने आज नागपूर आणि जवळील जिल्ह्यांसाठी  'यलो अलर्ट' जारी केला आहे.

विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह निर्जन ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. RMC ने आज 24 जुलै दरम्यान नागपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

नागपूर व्यतिरिक्त, RMC ने वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम साठी यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र, चंद्रपूर आणि गडचिरोली साठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज  सुद्धा वर्तविण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.