चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज जिल्ह्यात 27 नवे कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण तर दोघांचा मृत्यू झाला. ( Chandrapur Corona )
Chandrapur Corona Cases: आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, 23 जुलै ला चंद्रपूर महानगरात 3, बल्लारपूर 8, भद्रावती 4, नागभीड 1, सिंदेवाही 1, मूल 3, सावली 1, राजुरा 1, चिमूर 2, वरोरा 1, कोरपना 2 असे एकूण 27 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 16 नागरिक कोरोनामुक्त झाले तर 2 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 119 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
महाराष्ट्र राज्यात आज 2 हजार 515 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली, सध्या राज्यात 14 हजार 579 बाधित सक्रिय आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.