चिमूर:- तालुक्यातील मासळ (बुज) येथील महिला शेतकरीच्या अंगावर अचानक वीज कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार १ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. मृतक महिलेचे नाव सौ. प्रियंका किशोर मोडक (३५) रा. मासळ (बुज) असे आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रियंका मोडक ह्या आपल्या शेतातील काम करून घरी परत जात असतांना अचानक अंगावर वीज कोसळली यात महिलेचा मृत्यू झाला. सदर घटनेने मोडक कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.