राजुरा:- शेतात काम करीत असतांनाच विजांच्या मेघ गर्जनेसह पाऊस जोरदार येऊ लागलं. पती-पत्नीच्या अंगावर कोसळली वीज. यात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीररीत्या जखमी आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना राजूरा तालुक्यातील कोडापेगुडा शेतशिवारात घडली.
मृतक शेतकऱ्याचे ना मानकू रामू कोडापे (वय 30) असे आहे. तर त्यांचा पत्नी नाव जंगूबाई कोडापे या गंभीररीत्या जखमी आहे. जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात आज दुपारी मेघ गर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.
कोडापेगुडा येथे कोडापे दांपत्य आपल्या शेतात काम करीत होते. त्याच दरम्यान अचानक वीज कोसळली. यात युवा शेतकरी मानकु कोडापे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा पत्नी गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. जखमी अवस्थेत राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. युवा शेतकऱ्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केला जात आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.