मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत, (Ekanth Shinde new CM of Maharashtra) नुकतेच त्यांनी मुख्यमंत्री पदाची राजभवनमध्ये शपथ घेतली. त्यानंतर अमित शहा व जे पी नड्डा यांच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी शपथ घेतली. त्यानंतर या दोघांवर अभिनंदनाचा तसेच शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, (Ekanth Shinde oath CM of Maharashtra) तसेच याचवेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते गृहमंत्री अमित शहा, आदींनी या नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आहे. (Sharad pawar Press conference)
दरम्यान, कोणताही आदेश हा दिल्लीतून आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर पडली. याची कल्पना कोणालाच नव्हती. कदाचित शिंदेंना सुजाण नसावी. या कार्यपद्धतीमध्ये आदेश एकदा दिल्यानंतर तो आदेश पाळावा लागतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, असं शरद पवार म्हणत फडणवीसांना टोला लगावला आहे. तसेच पवारांनी या दोघांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.
मागील दहा दिवसांपासून बंडखोर आमदार राज्याच्या बाहरे होते. आसाममध्ये जे आमदार गेले त्यांची नेतृत्व बदलण्याची मागणी होती. पण भारतीय जनता पार्टीमध्ये आदेश एकदा आल्यानंतर तंतोतंत पाळावा लागतो याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसेच पवारांनी या दोघांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.