चंद्रपूर : बियाणं विकणाऱ्या कंपण्यानं यावर्षी बळीराजाला फसविलं.” विक्रात ” नावाचं सोयाबीन बियाणं 'अंकुर' उगविलचं नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा संकटांना तोंड द्यावं लागतं आहे. कृषी विभाग थेट बांध्यावर जावून शेतकऱ्यांचा तक्रारी ऐकल्या असून बोगस बियाणं विकणाऱ्या कंपनीवर कार्यवाहीचे संकेत विभागानं दिले आहेत.
हवामान खात्यानं यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळं लगबगीनं शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपलीत. काहीनी घाईघाईनं धूळ पेरणी केली. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यावर बहूतांश शेतकऱ्यांनी उरकली. एकीकडे पाऊस लांबत असल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना बियाणे विकणाऱ्या कंपनीने फसविलं आहे. त्यामुळं दुबारपेरणीच संकट शेतकऱ्यांवर ओढावलं आहे. सोयाबीनचे वाण उगविले नसल्याचा अनेक तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यात. कृषी विभागाने थेट बांध्यावर जावून तपासणी केली. या तपासणीत विक्रांत आणि ओसवाल या कंपनीच्या सोयाबीन बियाणाचं उगवणीचं प्रमाण कमी दिसून आलं आहे. दरम्यान कंपनीवर कार्यवाहीचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत.