मोठी बातमी चंद्रपूर: पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघातात गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकांचा मृत्यू - Batmi Express

Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,Accident,Accident News,

Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,Accident,Accident News,

चंद्रपूर
: पडोली-घुग्घुस मार्गावरील खुटाळा गावाजजवळील राजस्थान फॅक्ट्रीजवळ भरधार ट्रकने दुचाकीला जबर धडक देवून झालेल्या भीषण अपघातात गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. नम्रता निखील टावरी (25), लक्ष टावरी (2) असे मृतकांचे नाव आहे. तर, निखील टावरी व कनक टावरी असे जखमींचे नावे आहेत. या घटनेमुळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

खुटाळा गावातील लहूजी नगरातील निखील टावरी हे पत्नी नम्रता, व लक्ष व कनक या तिघांना घेवून रूग्णालयात जात होते. रूग्णालयात जात असतांना राजस्थान फँक्ट्री जवळ धरभाव वेगात येणाऱ्या ट्रकने टावरी यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती कि, गर्भवती नम्रता टावरी व दोन वर्षीय लक्ष टावरी चा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, पती निखील टावरी व कनक टावरी हे गंभीर जखमी झाले. दरम्यान घटनास्थळी उपस्थित नागिरकांनी ट्रकचालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 
विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वी खुटाळा येथील गावकऱ्यांनी अवजड वाहतूक गावातून होवू नये यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, शनिवारी पुन्हा अवजड वाहनाने गर्भवती महिलेसह दोन वषी्रय बालकास जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे लहूजी नगरात शोककळा पसरली आहे. पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.