बिहार मधील पटना येथे एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिच्या जवळच्या काकांनी देह व्यवसायाच्या अड्ड्यावर विकले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आपल्या भावाच्या हातातील कामाबद्दल सांगून मदतीची याचना केली.
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि मुलीचा मुजफ्फरपुर शहरात शोध घेतला. पोलिसांनी आरोपी काका आणि मुलीला विकत घेणारा दलाल यासमीन यालाही अटक केली आहे. 10 वर्षांच्या मुलीला काकांनी 50 हजार रुपयांना विकले होते. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून त्याच्या भावाने आपल्या 10 वर्षांच्या मुलीला मुजफ्फरपुर मध्ये वेश्याव्यवसायासाठी विकल्याचा आरोप केला आहे.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी काका आणि खरेदी दाराला अटक करून मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.