विदर्भासह नागपुरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेनं थैमान घातलं आहे. याच उष्णतेच्या लाटेनं नागपुरात 3 दिवसांत तब्बल 4 जणांचा बळी घेतल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान रस्यावर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या 4 व्यक्तींना जेव्हा रूग्णालयात नेण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित असल्याचं सांगितलं. त्यामुळे शहर आणि परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.
यासंदर्भात प्रशासनाकडून काळजी घेण्याचं अवाहन करण्यात येत आहे. सध्या नागपूरात उष्णतेचा पारा 45 अंशावर आहे.