विद्यार्थ्यांचं त्यांच्या घरी जाऊन पालकांसहित पुष्गुच्छ आणि मिठाई देऊन अभिनंदन करण्यात आला . |
कर्मवीर कन्नमवार कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथील उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम, नुकताच इयत्ता 12 वीचा निकाल ( HSC Result 2022 ) जाहीर झाला. यात विद्यालयाचा निकाल 100 % लागला असून, इयत्ता 12 वी मधून प्रथम , द्वितीय, आणि तृतीय गुणांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या घरी जाऊन पालकांसहित पुष्गुच्छ आणि मिठाई देऊन अभिनंदन करण्यात आला .
या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य.श्री पिलारे सर ,सोबत बगमारे सर, उईके सर, राणे सर, महाजन बाबुसाहेब, हेडाऊजी , मुलतानेजी, कार सर आणि संदीप ढोरे सर गावातील प्रतिष्ठित उपसरपंच गोपालजी कार तंटामुक्त अध्यक्ष देवचंदजी तलमले संतोष पचारे, डॉ.तुकारामजी ढोरे, नंदलालजी कार सुभाष तलमले चेचराम तलमले उपस्थित होते.
कुमारी श्रध्दा देवचंद तलमले (Shraddha Devchand Talmale ) सावलगाव ही विद्यार्थिनी 78 % गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम आली. तर ओमशिवाय पोहनकर ( Omshivaay Pohankar ) सावलगाव हा विद्यार्थी 77% गुण घेऊन द्वितीय ,तर कुमारी प्रगती कामडी ( Pragati Kamdi ) सुरबोडी हिने 76% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करण्यात आला. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला.