आरमोरी:- तालुक्याच्या काही अंतरावर असेलेल्या अरसोडा गाव शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यांत महिला ठार झाल्याची घटना आज दिनांक:-१३/५/२०२२ ला सकाळच्या सुमारास घडली आहे.
मृतक महिलेचे नाव नलुबाई बाबुलाल जांगळे वय वर्षे ३५ असे असून अरसोडा गावातील रहिवाशी आहे.
प्राप्त माहतीनुसार सविस्तर वृत्तांत असे आहे की, नलुबाई हि रोजच्या प्रमाणे स्वताच्या शेतावर काम करण्यासाठी गेली होती. कारणं शेतामध्ये धानपिकाची लागवड केली असल्यामुळे आणि कुटुंबाचा संपुर्ण भार नलुबाईवर असल्याने धानपिक हाती येई पर्यंत शेतावर धानपिकाची देखभाल करण्यासाठी रोजच जावे लागत असे. कारण नलिबाईचे पती बाबुलाल हे खुप दिवसापासून आजारी असल्यामुळे कुटूंबाची सर्व जबादारी म्हणा की कर्ती महिला ही नलूबाई होती. मात्र नियतीला ते मान्य नव्हते आणि जंगला लगत शेत असल्यामुळें शेतातील बांधाआड दबा धरून बसलेल्या वाघाने नलूबाईच्यां अंगावर झडप घालून नलूबाईच्या नरडीचा घोट घेत ठार केलें. हि माहिती काहीं शेताजवळ शेतकऱ्याना व गावकऱ्यांना माहिती होताच त्यानी घटनास्थळाकडे धाव घेतली मात्र नलूबाईचां जागिच मृत्यू झाला होता. मात्र रक्ताचा घोट घेणारा नरभक्षक वाघ तिथेच दबा धरून बसला होता. काहीं लोकांना दिसला असता आरडाओरड केली व त्या नरभक्षक वाघाला तेथून पळवून लावला.!
नलुबाईच्या पछात्य कुटुंबात एकुण ४ जण त्यामध्ये पती,तिन मुली असा लहानगा परीवार आहे.
कुटुंबाची कर्ती महिला निघुन गेल्याने जांगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावपरीसर व जांगळे कुटुंब शोकसागरात बुडालेला आहे.
वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता संबधित वनविभागाने नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा. व जांगळे कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जांगळे कुटुंबांनी व ग्रामवासियानी केली आहे.