चंद्रपूर: चंद्रपुरात दारुचा मुद्दा पुन्हा तापला, देशी दारू दुकान रद्द करा - Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Live,Maharashtra,Maharashtra Live,
Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Live,Maharashtra,Maharashtra Live,

चंद्रपूर
:- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठविली गेल्याच्या निर्णयाला आता वर्ष होत आले आहे. या काळात उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने देशी दारू, बियर शॉप-बार यांचे परवाने मंजूर केल्याचा आरोप होत आहे.
चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयावर आज दारू दुकानांविरोधात महिलांनी मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला. शहरातील दत्तनगर -जगन्नाथ बाबानगर व अन्यत्र नियम डावलून देशी दारू दुकाने व बिअर शॉप वाटल्याचा आरोप महिला आंदोलकांनी केला.
नियम धुडकावून धार्मिक स्थळे, शाळा आदींच्या जवळही दुकाने मंजूर केल्याने नागरी वस्तीतही आता मद्यपींची दंडेली सुरू झाली आहे. चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. जोवर नियमबाह्य पद्धतीने दिली गेलेली दारू दुकाने बंद होत नाही, तोवर आंदोलनांची मालिका सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने व्यक्त केलाय.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.