'
30 seconds remaining
Skip Ad >

एक वर्षापासून प्रेम संबंध, लग्नाचे अमिश दाखवून वारंवार शारीरिक संबंध, १७ वर्षीय पीडिता सहा महिन्यांची गर्भवती - Batmi Express

0

crime,Maharashtra,crime news, Maregonv

मारेगाव
: लग्नाच्या आणाभाका घेत अल्पवयीन  प्रेयसीशी वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केले. यातून प्रेमाचा अंकुर पोटात वाढू लागताच “तो मी नव्हेच” अशी भूमिका घेत तिला झिडकारले. मोटारसायकलने उडविण्याची धमकी दिली. त्यामूळे हादरून गेलेल्या मुलीने पोलिसाकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी मुलगी १७ वर्ष ११ महिन्याची आहे. आरोपी स्वप्नील अय्या टेकाम वय २० वर्ष (रा. मेंढणी ता मारेगाव) आणि ती एकाच गावातील. बोलण्यातून आणि ओळखीतून कधी सूत जुळले हे कळले नाही. एक वर्षा पासून त्यांच्यात प्रेम संबंध सुरू होते. यातच लग्नाच्या आणाभाका घेऊन सर्व मर्यादा सोडल्या. ती आई – वडिलांना विविध कारणे सांगून त्याला एकांत स्थळी भेटायची. तो ही लग्न करणारच आहो, असे सांगून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला. यातूनच ती सहा महिन्यांची गरोदर आहे.

तीला दिवस जाताच प्रियकराने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे. ती त्याला सहा महिन्यांपासून समजावत आहे. पण तो ऐकायला तयार नाही. आता तर धमकी द्यायला सुरुवात झाली. जर तू माझे नाव घेतले तर, मोटारसायकलने उडवून ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे, हादरलेल्या मुलीने ९ मे रोजी पोलिसांकडे धाव घेत आपले गाऱ्हाणे मांडले. पोलिसांनी पिडीतीची तक्रार लिहून घेत आरोपी स्वप्नील विरुद्ध भादवी ३७६,५०६ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×