गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ परीक्षाबाबत चर्चा होणार....
आपणांस कळविण्यात येते की मा. कुलगुरु महोदयांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची तातडीची सभा दिनांक २३ मे, २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता आभासी पध्दतीने आयोजीत करण्यात आलेली आहे.
सदर सभेपुढील विषय खालील प्रमाणे आहेत .
१) गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ च्या परीक्षा दिनांक १/६/२०२२ पासून विश्लेषनात्मक ( Descriptive ) पध्दतीने घेण्यात येणार असून परीक्षेचे वेळापत्रक सुध्दा घोषीत करण्यात आलेले आहे. या परीक्षा पध्दतीबाबत विविध संघटनाकडून निवेदन प्राप्त झालेले असून महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाने परीक्षा पध्दतीबाबत घेतलेल्या निर्णयाचा अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ परीक्षा पध्दतीबाबत चर्चा करून निर्णय घेणे करीता उपरोक्त समेला विद्यापरिषदेचे सर्व सन्माननिय सदस्य व निमंत्रीत सदस्यांनी आभासी ( Online ) पध्दतीने उपस्थित राहून सहकार्य करावे हि विनंती.
टिप : सदर सभा Zoom App द्वारे आभासी पध्दतीने आयोजीत करण्यात आली आहे व सभेचे लिंक सर्व सन्माननिय सदस्यांना Email घर लवकरच पाठविण्यात येईल.