गडचिरोली: कोरोनानंतर कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे आगामी उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची घोषणा गोंडवाना विद्यापीठाने केली आहे. मात्र, अर्ध्यापेक्षा जास्त सत्रात ऑनलाइन पद्धतीने शिकविले गेल्यानंतर आता परीक्षा का ऑफलाइन घेण्यात येत आहेत, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहे. गोंडवाना विद्यापीठाने सदर निर्णय मागे घेऊन ऑनलाइन परीक्षा घ्यावी.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अन्य राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कॉलेज सुरू झाले, परंतु अनेक वर्गांचा बहुतांश अभ्यासक्रम अद्यापही पूर्ण झालेला नाही. प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करायला विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, ऑफलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांना पुरेसा अवधी मिळाला नसल्याने येणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात यावा, असाही आग्रह विद्यार्थी धरत आहे.
ऑनलाईन शिकवले परीक्षा ऑफलाईन का ?
कोरोनानंतर कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे आगामी उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची घोषणा गोंडवाना विद्यापीठाने केली आहे. मात्र, अर्ध्यापेक्षा जास्त सत्रात ऑनलाईन पद्धतीने शिकविले गेल्यानंतर आता परीक्षा का ऑफलाइन घेण्यात येत आहेत, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्या.