Coronavirus Live: देशात पुन्हा कोरोनाचे नवीन रुग्णात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मागील गेल्या 24 तासांत देशात 2,593 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 15,873 आहे, तर या कालावधीत 44 लोकांचा मृत्यू पण झाला आहे.
अधिकारीक माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 187.65 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर सर्वात वेगवान आहे. दिल्लीत एक हजाराहून अधिक नवीन प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. शनिवारी येथे कोरोना विषाणू संसर्गाची 1,094 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि महामारीमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीतील संसर्ग दर 4.82 टक्क्यांवर पोहोचला आहे.
वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना जास्तीत जास्त कोरोना चाचण्या घेण्याचा आणि लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.