गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे घरगुती भांडणावरून नवऱ्यानेच बायकोची हत्या केल्याची घटना रविवार दिनांक 24 एप्रिल रविवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. विद्या देविदास चौथाले वय 24 वर्ष रा आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून देविदास पुंजाराम चौथाले वय 30 वर्ष रा. आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे आरोपी पतीचे नाव आहे.
Read Also: आरमोरी Exclusive: नीळकंठ मोहूर्ले याचा मेंडेबोडीत आढळला मृतदेह
आष्टी येथील देविदास चौथाले यांचा आंतरजातीय विवाह दोन वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील विद्या नरोटे ही हिच्याशी झाले होते.नवरा बायकोच्या घरगुती भांडणावरून ही हत्या झाल्याचे बोलल्या जात आहे.आरोपी देवीदासने पत्नीच्या डोक्यात राडने मारून हत्या केली.व तशी स्वतः आष्टी पोलीस ठाण्यात हजर होऊन हत्येची कबुली दिली.
Read Also: बापरे...! लग्नाच्या एक दिवस आधीच नवरीने दिला बाळाला जन्म; बाळाचा बाप निघाला मुलीचा…
आरोपी अटकेत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले यांच्या तपासी पथकाकडून सुरू असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या धक्कादायक घटनेने आष्टी शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.