तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

बापरे...! लग्नाच्या एक दिवस आधीच नवरीने दिला बाळाला जन्म; बाळाचा बाप निघाला मुलीचा… - Be Network

लग्नाच्या आधी जर एखादी मुलगी गर्भवती असेल तर लोक तिच्याबाबत काहीही बोलतात. चर्चा करतात. एका नवरीने लग्नाच्या बरोबर एक दिवस आधीच बाळाला जन्म दिला आहे.

लग्नाच्या आधी जर एखादी मुलगी गर्भवती असेल तर लोक तिच्याबाबत काहीही बोलतात. चर्चा करतात. एका नवरीने लग्नाच्या बरोबर एक दिवस आधीच बाळाला जन्म दिला आहे.

छत्तीसगढ
:- लग्नाच्या आधी जर एखादी मुलगी गर्भवती असेल तर लोक तिच्याबाबत काहीही बोलतात. चर्चा करतात. अशातच अनेकदा लग्न देखील मोडलं जातं. पण काही वेळा भलतंच घडतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका नवरीने लग्नाच्या बरोबर एक दिवस आधीच बाळाला जन्म दिला आहे.

यानंतर पुढे जे काही घडलं ते समजल्यावर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लग्नाच्या 24 तास आधी नवरीबाई आई झाली आहे. मात्र यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यातील बडेराजपूर येथे आदिवासी समाजातील लोक राहतात. येथे राहणाऱ्या शिवबत्ती हिचा विवाह 31 जानेवारी रोजी ओडिशाच्या चंदन नेतामसोबत ठरला होता. लग्नाच्या एक दिवस आधी म्हणजेच 30 जानेवारीला शिवबत्तीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता.
मात्र, याचदरम्यान अचानक तिच्या पोटात दुखू लागलं. उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहीच वेळात समजलं की तिने एका बाळाला जन्म दिला आहे.

विशेष म्हणजे बाळ होताच वर आणि वधू पक्षातील मंडळी खूप आनंदी झाली. लग्नासोबत आता बाळ झाल्याने त्याचा आनंद डबल झाला. घरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. याबाबत नवरीची आई सरिता मंडावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी समाजात पैठू प्रथा नावाची एक प्रथा आहे.

पैठू प्रथा म्हणजेच एकप्रकारचं लिव्ह इन रिलेशनशिपही म्हणू शकता. या प्रथेमध्ये मुलगी आपल्या कुटुंबीयांना माहिती देऊन आणि त्यांच्या परवानगीने आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्नाच्या आधीच राहायला सुरुवात करते.काही वेळ सोबत घालवल्यानंतर म्हणजेच पैठू झाल्यानंतर दोघांचे कुटुंबीय त्यांचं लग्न लावून देतात. या प्रथेतूनच शिवबत्ती 2021 मध्ये आपल्या आवडीचा मुलगा चंदन याच्या घरी पैठू गेली होती. ते दोघे जवळपास आठ महिने एकत्र राहिले होते.

याचा दरम्यान ती गर्भवती राहिली. यानंतर दोन्हीकडच्या मंडळींनी त्यांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला आणि लग्नपत्रिका छापली. घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच नवरीने लग्नाच्या आधीच बाळाला जन्म दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.