आरमोरी: नीळकंठ मोहूर्ले यांचा मेंडेबोडीत आढळला मृतदेह - Be Network

Armori Murdered,Armori,Armori Live,Armori News,Armori Crime,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli Murdered,


Gadchiroli News,Armori Crime,Gadchiroli,Gadchiroli live,Armori Murdered,Armori Live,Gadchiroli Murdered,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,


  • 25 Apr 2022 10:40 AM (IST) ( Update News )
आरमोरी:- मेढेबोडी येथे सुकाळा येथील इसमाचा मृतदेह शनिवारी सकाळी ६ आढळून आला.नीलकंठ गोविंदा मोहुर्ले(४०) असे मृतावस्थेत आढळलेल्या इसमाचे नाव आहे. नीलकंठ हा २३ एप्रिल रोजी सायंकाळी मेंढेबोडी येथे आला होता कदाचित तो दारू पिण्यासाठी आला असावा असा अंदाज आहे. तो घरी परतला नाही. सुकाळा येथे शनिवारी मोहुर्ले कुटुंबातच जेवणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात तो असावा असे घरच्या लोकांना वाटले. २४ ला सकाळीच नीलकंठ मेंढेबोडी येथे मृतावस्थेत आढळून आला. गावातील नागरिकांनी याची माहिती नीलकंठच्य कुटुंबीयांना दिली. 

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार मृतावस्थेत असलेल्या नीलकंठच्या शरीराचा डोक्याकडचा पूर्ण भाग सीडीवर्क (लहान पुला) मध्ये शिरला होता. त्याच्या डोक्याला, गालाला छातीला जबर मार होता. दारू पिऊन पडला असता तर तेवढ्या जबर जखम झाल्या नसत्या. नालीत पडल्यानंतर डोके पुलामध्ये शिरले नसते. त्यामुळे हा घातपात असावा असा आरोप मोहुले कुटुंबीयांनी केला आहे. पुढील तपास ठाणेदार काळबांडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.


  • 24 Apr 2022 9:28 AM (IST) ( Old News ) 
आरमोरी:- तालुक्यातील सुकाळा येथील नीलकंठ मोहुर्ले ( 40 वर्ष )  हे सकाळच्या सुमारास मेंडेबोडी गावांमध्ये आले होते परंतु अंदाजे सात वाजताच्या सुमारास गावातील नालीमधे त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती आरमोरी पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे .पुढील तपास पोलीस स्टेशन आरमोरी करीत आहे.

नेमका मृत्यु कशामुळे झाला अजूनही गुलदस्त्यात आहे.

थोडक्यात वृत्त - नीलकंठ मोहुर्ले ( 40 वर्ष )  हे सकाळच्या सुमारास मेंडेबोडी गावांमध्ये काही कामानिमीत्य आले होते. मृतदेह मेंडेबोडी गावातील नालीमधे आढळून आला. अंदाजे नीलकंठ यांचा मर्डर (murdered ) करण्यात आल असावं. मेंडेबोडी येथील नालीमधे त्यांचा मृतदेह आढळून आल्याची घटना सात वाजताच्या सुमारास गावातील नागरिकांना माहित झाली. या घटनेची माहिती आरमोरी पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन आरमोरी करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.