झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील तोरपा येथे लग्नसमारंभात झालेल्या किरकोळ भांडणानंतर अर्धा डझन अल्पवयीन मुलांनी १० वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. माहिती मिळताच पोलिसांनी या सर्व आरोपी अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायतीमध्ये प्रकरण न सुटल्याने पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यावर ही घटना उघडकीस आली. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी पाच अल्पवयीन आरोपींना अटक केली, तर एका आरोपीला आज अटक केली जाऊ शकते. त्यांनी सांगितले की, आरोपी आणि पीडित सर्व आदिवासी समाजातील आहेत.
बातमीनुसार, गावात एक लग्न होतं. दहा वर्षांची पीडित मुलगीही त्यात सहभागी होण्यासाठी गेली होती. मुलीसोबत लग्नाच्या वरातीत आलेल्या काही मुलांमध्ये लग्नात काही गोष्टीवरून वाद झाला. बाचाबाचीनंतर मुलगी रात्री आपल्या गावी परतत असताना ठरल्याप्रमाणे सहाही अल्पवयीन मुलांनी तिला बळजबरीने पकडून एका निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
बलात्कारानंतर पीडितेने कसेतरी तिच्या घरी पोहोचून कुटुंबीयांना याची माहिती दिली. या घटनेनंतर पंचायत बोलावून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र काही निष्पन्न न झाल्याने पीडितेच्या आईने एफआयआर दाखल केला.
याप्रकरणी पोलिसांनी सहा अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी नऊ ते 15 वयोगटातील असून सर्व शाळेत शिकतात. अटक करण्यात आलेल्या सर्व अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.