Breaking! आष्टी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार - Be Network

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Accident News,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Chamorshi,Chamorshi News,
Gadchiroli News,Chamorshi,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Accident News,Chamorshi News,Gadchiroli Batmya,

गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील चामोर्शी रोडवरील पेट्रोलपंप नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 24 एप्रिल रविवारी संध्याकाळी पाऊने सात वाजताच्या दरम्यान घडली. विनोद मंगर वय 34 वर्ष रा. मुरखळा ता चामोर्शी जि गडचिरोली असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे. 

मृतक संध्याकाळी तारसा येथून दुचाकी क्रमांक एम एच 33 ई 653 या ने स्वगावी मुरखळा येथे जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्याचा मेंदू बाहेर पडला व तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुंदन गावडे हे घटनास्थळी दाखल झाले. मृतकास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस तपास करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.