आरमोरी ( Armori Suicide) :- आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बोळधा गावाच्या शेतशिवारात 20 मार्चला सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली . मृतक युवकाचे नाव - आकाश श्रावण चुधरी ( वय - 22 ) असे आहे. ( Young man commits suicide by hanging in Armori taluka )
प्राप्त माहितीनुसार , बोळधा गावापासून 1 किमी अंतरावर असलेल्या स्वमालकीच्या शेतातील आंब्याच्या झाडाला रस्सीच्या सहाय्याने आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केली . दरम्यान शेतशिवारात गेलेल्या काही नागरिकांना आकाश झाडाला अडकून मृतावस्थेत आढळून आला या घटनेची माहिती कळताच आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार टीकाराम ठाकरे आणि मामूलकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला . याप्रकरणी आरमोरी पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आला आहे . वृत्त लिहेस्तोवर आकाश चुधरी या युवकाच्या आत्महत्येचा कारण कळला नसून पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहेत .