'
30 seconds remaining
Skip Ad >

Traffic Branch Action On Drunk And Drive: मद्यपी वाहन चालकांवर वाहतूक शाखेची कारवाई; मद्यप्राशन न करता वाहने चालविण्याचे केले आवाहन - Batmi Express

0

Maharashtra,Maharashtra Live,Maharashtra News,Maharashtra Today,Kalyan,

कल्याण
: कल्याण शहर वाहतूक शाखेने (Kalyan City Traffic Branch) धुलिवंदनाच्या दिवशी वाहतूक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन करणाऱ्या १९४ वाहन चालक, ५९ मद्यपी वाहन चालकावर कारवाईचा बडगा उचल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन, मघपी वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.

कल्याण-डोंबिवली विभागात वाहतूक शहर शाखेतर्फे धुलिवंदनच्या दिवशी ५९ मद्यपी चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येऊन कल्याण शहर वाहतूक शाखा कडील २४ मद्यपी वाहन चालक कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या कारवाईत २५ मद्यपी वाहन चालक व डोंबिवली वाहतूक शाखेच्या कारवाईत १० मद्यपी असे एकूण ५९ मघपी वाहन चालकांवर मोटर वाहन कायदा कलम १८५ व १८८ अन्वय कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत हेल्मेटचा वापर न करणाऱ्या १२५ वाहनांवर तसेच दुचाकी वरुन ट्रिपल सीटने प्रवास करणाऱ्या ६९ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

५९ मद्यपी वाहन चालक पैकी एकूण अकरा जणांना कल्याण न्यायालय येथे हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी दहा हजार रुपये दंड असा एकूण एक लाख दहा हजार दंड व इतर पाच जणांकडे लायसन्स नसल्यामुळे प्रत्येकी पाच हजार दंड अतिरिक्त २५ हजार असे एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे व तीन महिन्याकरता ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केलेले आहे तरी वाहनचालकांना आव्हान करण्यात येते की आपण मद्यप्राशन करून वाहन ड्राईव्ह करू नये असे अवाहन कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तिरडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×