Gondia Police Big Action: दुचाकीवर पकडला चक्क ८० किलो १२ लाखांचा गांजा, अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले - महिला पोलीस निरीक्षक | Batmi Express

Be
0

Gondia,Gondia Live News,Gondia Marathi News,gondia news,Gondia Crime,
Gondia Police Big Action: दुचाकीवर पकडला चक्क ८० किलो १२ लाखांचा गांजा

सालेकसा
: गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सालेकसा पोलिसांनी नाकाबंदी करून गांजा घेवून जाणाऱ्या व्यक्तीला झालिया येथे अटक केली. त्याच्याकडून १२ लाख रुपये किमतीचा ८० किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय भिसे यांच्या मार्गदर्शनात सालेकसा पोलीस अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. 

१७ मार्च रोजी एक व्यक्ती मोटारसायकलवरून गांजा घेवून जात असल्याची माहिती सालेकसा पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी आमगाव मार्गावरील झालिया येथे नाकाबंदी केली. एक व्यक्ती मोटारसायकलवर एक पोते बांधून जात असल्याचे दिसल्याने त्याला थांबवून झडती घेण्यात आली. त्याच्याकडे १२ लाख रुपये किमतीचा ८० किलो गांजा मिळून आला. ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, ४ हजार ३४० रुपये रोख आणि इतर साहित्य असा एकूण १२ लाख ५० हजार ३१५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, सुनील जानकर, हवालदार उईके, पोलीस नायक अग्निहोत्री, इंगळे, रोकडे, गौतंम, बैस, मुकेश ढेकवार, सुरेंद्र दसरीया, गीतेश दमाहे, उत्तम सुलाखे यांनी केली. महिला पोलीस निरीक्षकांच्या उत्तम कार्यशैलीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->