Molestation | भर रस्त्यात पोरीचा हात पकडला आणि… UP, बिहार नाही तर बीडमध्ये घडली धक्कादायक घटना - Batmi Express

beed,beed news,Beed Crime News,Crime,crime news,Maharashtra,

beed,beed news,Beed Crime News,Crime,crime news,Maharashtra,

बीड :
 बीडमध्ये पुन्हा एकदा महिला अन् मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या शाळकरी विद्यार्थीनीला, भररस्त्यात अडवून छेडछाड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. (Student molested The annoying type that happened in Beed).

भररस्त्यात छेड काढण्याचा प्रयत्न

बीड शहरातील सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारी पीडित विद्यार्थिनी, नेहमी प्रमाणे शिकवणीसाठी गेली होती. यावेळी सायकलवरून घरी परतत असताना, आरोपी वैभव चंद्रसेन क्षीरसागर १९, रा . संत नामदेवनगर, बीड याने, दुचाकीवरून येत तिला अडवले. आणि त्याने भररस्त्यात हात पकडत छेड काढण्याचा प्रयत्न केला.

महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान पीडितेने घरी गेल्यावर हा सर्व प्रकार कुटुंबातील व्यक्तींना सांगितला. त्यानंतर बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात याविषयी तक्रार दिली असून आरोपी वैभव क्षीरसागर विरोधात बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात, विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आला आहे. तर या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात महिला अन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.