'
30 seconds remaining
Skip Ad >

भीषण अपघात... बस उलटून विद्यार्थ्यांसह आठ जणांचा मृत्यू, २० हुन अधिक जखमी - Batmi Express

0
Karnataka,Karnataka  News,Karnataka Latest News,Karnataka Live,Accident,Accident News,Accident News Live,
भीषण अपघात... बस उलटून विद्यार्थ्यांसह आठ जणांचा मृत्यू

बस उलटून भीषण दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात 8 जणांनी जीव गमवला आहे. तर 20 हून अधिक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या बसमध्ये 60 प्रवासी होते. ही धक्कादायक घटना कर्नाटक इथल्या तुमकुर जिल्हातील पावागडा जवळ घडली आहे. 
 
कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला. बस उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. पावागडामध्ये झालेल्या या अपघातात २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये ६० हून अधिक लोक प्रवास करत होते. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने हॉ़स्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीनं उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमधून काही विद्यार्थी देखील प्रवास करत होते. मृत आणि जखमींमध्येही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×