'
30 seconds remaining
Skip Ad >

होळी पार्टीसाठी गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू - Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Ballarpur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

बल्लारपूर (
Ballarpur ) :- होळी ( Holi ) हा रंगाचा उत्सव या सणाच्या निमित्ताने आपले मतभेद मनभेद विसरून एकोप्याने राहण्याचा दिवस आहे. मात्र होळी किंवा रंगपंचमीच्या दिवशी अशा काही घटना घडतात. ज्या आयुष्यभर मनाला चटका लावून जातात अशीच एक घटना बल्लारपूर शहरात घडली.

बल्लारपूर शहरातील सातखोली परिसर गुरुनानक विज्ञान महाविद्यालय लगतच्या परिसरातील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते अजय चव्हाण यांचा मुलगा कुणाल चव्हाण वय-१९ वर्ष हा १८ मार्च ला होळी खेळून झाल्यावर आपल्या मित्रासोबत पार्टी करण्याच्या निमिताने कळमना मार्गावरील कोर्ती-मक्ता येथील शेतात गेले असता सायंकाळी ६:३० वाजता पार्टी करत असताना उच्च दाबाच्या विजेचा करंट लागल्याचे वृत्त आहे.
या घटनेची माहिती कळताच सदर युवकाला चंद्रपुरातील (Chandrapur ) पोद्दार रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र संबंधित डाक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले येथील डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी सदर युवकाला मृत घोषित केले.
याविषयीच्या अधिक माहितीनुसार कुणाल चव्हाण व त्यांचे मित्र शेतात पार्टी करण्यासाठी गेले असता विजेचे कनेक्शन घेण्यासाठी तार जोडत असतांना हाय व्होल्टेज करंट शी संपर्क आल्यामुळे सदर घटना घडली व यामुळं कुणाल ला आपला जीव गमवावा लागला या घटनेमुळे बल्लारपूर शहरातील गुरुनानक विज्ञान महाविद्यालय परिसरात शोकाकुल वातावरण असून या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×