'
30 seconds remaining
Skip Ad >

Curfew Order Issued In Mumbai | मुंबईत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी; विविध उपकरणांवरही घालण्यात आली आहे बंदी - Batmi Express

0

Curfew Order Issued In Mumbai ,Mumbai,Mumbai Live,live mumbai news,latest mumbai news,mumbai news live,Maharashtra,Maharashtra Today,Maharashtra News,

मुंबई : मुंबई शहरातील (Mumbai City) शांतता आणि सुव्यवस्था (Peace and Order) अबाधित ठेवण्यासाठी १४४ कलम (Article 144) लागू करण्यात आले आहे. ही जमावबंदी (Curfew Order) ८ एप्रिलपर्यंत असणार आहे. या कालावधीत मुंबईत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरिअल मिसाईल आदी उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कलम १४४ नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

या आदेशामुळे या काळात मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमता येणार नाही. याशिवाय, मोर्चा, मिरवणूक, वरात आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरही मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर मुंबईतील कोणत्याही भाग ड्रोन उडवण्यासही पोलिसांनी मनाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या या निर्णयानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पोलिसांनी अचानक जवळपास २० दिवसांची जमावबंदी का लागू केली, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. परंतु, हा निर्णय केवळ मुंबईतील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

१९५१ मधील अधिकारानुसार, पोलिस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी मुंबईच्या हद्दीत ८ एप्रिल २०२२ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केले आहेत. शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पॅराग्लायडर्स, बलून, पतंग उडवणे, उंच जाणारे फटाके तसेच लेसर प्रकाश (बीम) यास प्रतिबंध आधीच करण्यात आला आहे. २० फेब्रुवारीला या संदर्भात आदेश काढण्यात आले होते. २० एप्रिल २०२२ पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कलम १४४ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

या जमावबंदीच्या नियमातून काही गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, सहकारी संस्था आणि अन्य संस्थांच्या बैठका, क्लबमध्ये होणाऱ्या बैठकांना वगळण्यात आले आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या गर्दीवरही कोणतेही निर्बंध नसतील.असे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×