'
30 seconds remaining
Skip Ad >

Edible Oil And Package Products Price Hike - सर्वसामान्यांना बसणार महागाईची फटका, खाद्यतेल आणि पॅकेज प्रॉडक्ट्सच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ होण्याचे संकेत

0

Edible Oil And Package Products Price Hike,Maharashtra,Maharashtra News,India News,Maharashtra Live,

ग्राहकांचा खर्च (Price Hike) आता वाढणार आहे. कारण गहू, तेल आणि इतर पाकिटबंद उत्पादनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एफएमसीजी कंपन्या (FMCG Companies) आपल्या उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) एफएमसीजी कंपन्यांना धक्का बसला आहे. या युद्धामुळे गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलांच्या किमतींमध्ये वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या वाढीचा काही भार उपभोक्त्यांना उचलावा लागू शकतो. डाबर आणि पार्लेजी यासारख्या कंपन्यांचे सध्याच्या परिस्थितीवर बारीक लक्ष असून ते महागाईच्या समस्येपासून लढण्यासाठी काही पावले उचलण्याच्या तयारीत आहेत.

काही अहवालांमध्ये म्हटलंय की हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्टले या कंपन्यांनी मागील आठवड्यात आपल्या खाद्य उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.

पार्ले प्रोडक्टसचे वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयांक शाह म्हणाले की आम्ही उद्योग क्षेत्राकडून किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढीची अपेक्षा करतो. त्यांनी म्हटले की किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार होत आहे. अशातच किमतींमध्ये किती वाढ होईल हे आताच सांगणे अवघड आहे. पामतेलाचा भाव १८० रुपये प्रति लिटरवर गेल्याचे त्यांनी सांगितले. आता तो १५० रुपये प्रति लिटरवर आला आहे. त्याचप्रमाणे, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १४० डॉलरवर गेल्यानंतर १०० डॉलरवर आली आहे.
शाह यांचे म्हणणे आहे की पूर्वीच्या तुलनेक भाव अजूनही जास्त आहेत. गेल्या वेळी एफएमसीजी कंपन्यांनी वस्तूंच्या किमती वाढवण्याचा संपूर्ण भार ग्राहकांवर टाकला नाही. आता प्रत्येकजण १०-१५% वाढीबद्दल बोलत आहेत. उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. ते म्हणाले की, पार्लेकडे सध्या पुरेसा साठा आहे. त्यामुळे दरवाढीचा निर्णय एक-दोन महिन्यांत घेतला जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×