'
30 seconds remaining
Skip Ad >

Accident: ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा ट्रेलर एसटीवर पडला अन्... | Batmi Express

0

Accident,Accident News,Accident News Live,Solapur,Solapur Live,Solapur Live News,Solapur news,Solapur Marathi News,Solapur Today,
ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा ट्रेलर एसटीवर पडला अन्...

Accident: चालत्या एसटीवर ऊसाचा ट्रेलर कलल्यामुळे विचित्र अपघात झाला. सुदैवाने यामध्ये मोठी दुर्घटना टळली. मात्र वाहतूक कोंडी झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. सोलापूरच्या माढा तालुक्यातील रोकडोबा मंदिरासमोर हा अपघात झाला. यानंतर जवळपास तीन तास ट्राफिक जाम झालं होतं.

Most Read News

माढ्यातून कुर्डूवाडीच्या दिशेने प्रवाशी घेऊन चाललेल्या एसटी बसवर ऊसाचा ट्रेलर कलला. यात मोठा अनर्थ टळला असला तरी तीन तास कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

सोलापूरहून कुर्डूवाडीकडे प्रवासी घेऊन चाललेली बस रोकडोबा मंदिरासमोरुन जात होती. त्याच वेळी ऊसाचा ट्रेलरही चालला होता. अचानकच ट्रॅक्टरच्या ट्रेलरचे चाक निघाले. त्यामुळे ऊसाच्या ट्रेलरचा लोड एसटी बसवर पडला.

दरम्यान, एसटीतील प्रवाशांना खाली उतरवण्याची तत्परता चालक आणि वाहकांनी दाखवली. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता जेसीबीच्या मदतीने ऊसाचा ट्रेलर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेमुळे मात्र मोठी वाहतूक कोंडी झाल्याने शेकडो वाहन धारक ताटकळले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×