HSC Exam 2022: बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत आढळली चुक! विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ गुण मिळणार - Batmi Express

Be
0

HSC Exams 2022,HSC Board Exam 2022,Education,HSC Board,HSC Board Exam,HSC 2022 News,Exam,
HSC Exam 2022: बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत आढळली चुक! 

नागपूर : 
बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली आहे. त्याच दरम्यान काल काल बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंग्रजी पेपर मध्ये बोर्डाकडून चूक झालेल्या आणि विद्यार्थ्यांने सोडवलेल्या एका प्रश्नाचा 1 मार्क विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे .

दरम्यान, राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.

कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जात आहे. एका वर्गात 25 विद्यार्थी बसवत परीक्षा केंद्रांवर 12वीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. या परीक्षा 7 एप्रिल पर्यंत चालणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->