चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथे राहत असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विनयभंग करण्यात आला. आरोपी गजानन सज्जन होले (32, सावंगा विठोबा) तसेच अल्पवयीन मुलीमध्ये दोन ते तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.
अशात आरोपी गजानन होले याने पीडित मुलीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. परंतु संबंधीत मुलीने नकार दिल्यानंतरही गजानन होले याने जबरदस्ती सदर मुलीचा विनयभंग केला. या घटनेसंदर्भात चांदूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.