'
30 seconds remaining
Skip Ad >

Gadchiroli Crime: गडचिरोलीत अल्पवयीन मुलीसोबत जरबरदस्तीने लग्न करून केला विनयभंग | Batmi Express

0

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Maharashtra Live,Crime,Gadchiroli Crime,Maharashtra,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,
गडचिरोलीत अल्पवयीन मुलीसोबत जरबरदस्तीने लग्न करून केला विनयभंग

गडचिरोली - घोट  :
रेगडी पोलीस (Regadi Police)  मदत केंद्राच्या हद्दीत येत असलेल्या एका अल्पवयीन ( Minor Girl )  मुलीवर अत्याचार झाल्याची घटना १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी रोजीच्या दरम्यान घडली. १० फेब्रुवारीला अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून रेगडी पोलीस मदत केंद्र येथे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. सुब्रतो कार्तिक देवनाथ  (वय ३० वर्ष), तापस विनय हलदर (वय ३१ वर्ष) दाेघेही रा. सुभाषग्राम अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. चामोर्शी न्यायालयाने ( Chamorshi court )  त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. विदेश चंडीचरण शहा (वय ३२ वर्ष) हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Read Also:

 दिनांक १९ जानेवारी १४ वर्षीय पीडित मुलगी ही गावालगतच्या नाल्यात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेली हाेती. तिच्या पाठीमागे आरोपी सुब्रतो देवनाथ व तापस हलदर हे मोटरसायकलने जाऊन पीडितेचा हात पकडून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून घटनास्थळावरून सुभाषग्रामकडे घेऊन गेले. अर्ध्या रस्त्यामध्ये तिला विदेश शहा याच्या चारचाकी वाहनात बसवून गावाजवळील तीन पत्थर मंदिरात नेऊन १९ जानेवारीला सायंकाळी ७. ३० वाजता आरोपी सुब्रतो देवनाथ याने मुलीच्या गळ्यात जबरदस्तीने हार टाकून लग्न झाल्याचे सांगितले. 

Read Also:

पीडितेला चारचाकी वाहनात बसवून नरेंद्रपूर येथील आरोपीच्या ओळखीच्या सरपंच कृष्णा मंडल यांच्या घरी नेले. तेथे जेवण करून आरोपी सुब्रतो यांनी पीडित मुलीला एकाच रूममध्ये झोपण्यास भाग पाडले. मुलीच्या फिर्यादीवरून रेगडी पोलीस मदत केंद्रात कलम ३६३, ३७६ (३), ५०६, ३४ भादंवि कलम ४,८ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रेगडी पो.केंद्राचे प्रभारी अधिकारी नंदकुमार शिंब्रे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×