तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Crime : चंद्रपूर पोलीसांची कडक कारवाई : मोबाईल हिसकावुन घेणाऱ्या आरोपीस अखेर अटक - Batmi Express

Chandrapur Crime,Chandrapur Crime News,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,,Chandrapur News IN Marathi,
Chandrapur Crime,Chandrapur Crime News,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,,Chandrapur News IN Marathi,
 मोबाईल हिसकावुन घेणाऱ्या आरोपीस अखेर अटक - चंद्रपूर पोलीस


चंद्रपूर ( Chandrapur Crime ): 
रोजी फिर्यादी नामे नेहल मनोज यादव, वय १५ वर्ष, धंदा- शिक्षण, जात-अहिर, रा. जयरामनगर, रयतवारी कॉलणी, चंद्रपुर यांनी रिपोर्ट दिली की, यातील फिर्यादी हा शाळेतुन आपल्या घरी जात असतांना यातील दोन अनोळखी इसम संगणमत करून फिर्यादीचे जवळ येवून आमची गाड़ी खराब झाली आहे असे सांगुन फिर्यादीस फोन लावायचे आहे असा बहाण करून फिर्यादीचा एक जुना वापरता विवो २० आय कंपनीचा मोबाईल किमंत ८ हजार रूपयाचा जबरदस्तीने हिसकावून पिवळया रंगाचे मोपेड गाडीवर बसुन निघुन गेले अशा फिर्यादीचे तोडी रिपोर्ट वरून नमुद आरोपीताना विरूध पोस्टे रामनगर अपक. १४५/२०२२ कलम ३९२,३४ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

हे देखील वाचा:

Russia Ukraine War Live Updates: चंद्रपूरातील सहा विध्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले

नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचारी हे पोलीस स्टेशन हद्दीत रवाना होवुन गोपनिय बातमिदाराचे माहिती वरून आरोपी नामे साहील राजु सरदार, वय २१ वर्ष, रा. वार्ड नं. ६ मेरी उजनगर, दुर्गापुर, चंद्रपुर. शुभम नानाजी कावरे, वय १९ वर्ष, रा. चंदुबाबा गेट वार्ड क. १, दुर्गापुर, चंद्रपुर यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली नमुद दोन्ही आरोपीतांकडून गुन्हयात फिर्यादीचा जबरदस्तीने हिसकावुन नेलेला मोबाईल तसेच गुन्हयात वापरलेली मोपेड गाडी जप्त करून पोस्टे ला अटक करण्यात आले आहे.सरदचा गुन्हा उघडकीस आणणे कामी गुन्हे शोध पथकाती सपोनि हर्षल अकरे, पोउपिन विनोद भुरले तसेच सर्व डी. बी. पथकातील कर्मचारी है अतिशय परिक्षम घेवुन गुन्हयातील अज्ञात अनोळखी आरोपीतांचा अवघ्या २४ तासात शोध घेवुन अटक केली आहे.

आरोपी नाव 

साहील राजु सरदार, वय २१ वर्ष, रा. वार्ड नं. ६ नेरी उर्जानगर, दुर्गापुर, चंद्रपुर शुभम नानाजी कावरे, वय १९ वर्ष, रा. चंदुबाबा गेट वार्ड क. १. दुर्गापुर, चंद्रपुर

 हे देखील वाचा:

विहिरीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

जप्त माल 

एक जुना वापरता विवो २० आय कंपनीचा मोबाईल किमंत ८ हजार रूपये गुन्हयात वापरलेली पिवळ्या रंगाची होन्डा डिओ मोपेड गाडी कमांक एम एच ३४ एएस ९६०४ किमत ५० हजार रूपये असा एकुण ५८ हजार रूपये सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा. चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी सा. उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल अकरे, पोउपनि विनोद भुरले पो हवा रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा / ०९ पेतरस सिडाम, नापोशि/ ११७६ किशारे वैरागडे, नापोशि/ आंनद खरात, नापोशि / ९१७ निलेश मुडे, नापोशि/ सतिश अवथरे, पोशी/ २४३० लालु यादव, पोशि/ २५१३ विकास जुमनाके, पोशि / हिरालाल गुप्ता यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.