विहिरीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह - Batmi Express

Hingoli,Hingoli News,Hingoli Accident News,Crime,crime news,Mudered,

Hingoli,Hingoli News,Hingoli Accident News,Crime,crime news,Mudered,

हिंगोली ( Hingoli News ): हिंगोली जिल्ह्यातल्या पान कनेरगाव ते वाढवणा शिवारात एका शेतातील विहिरीमध्ये पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदरील घटना ही आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे यांच्यासह पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. त्याचं बरोबर मृतदेह पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. 

सदरील इसमाचा मृतदेह पोत्यात बांधून पाण्यात फेकले यामुळे, त्याचा चेहरा देखील  ओळखणे कठीण झाले आहे. मृतदेह विहरी बाहेर काढून कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

पानकनेरगाव या गावातील एक इसम हरवल्याची तक्रार पोलिस स्थानकात प्राप्त झाली आहे. ओळख पटल्यानंतर तो इसम कोण हे निष्पन्न होणार आहे, अद्याप या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नसून, पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.