CoronaVirus In Chandrapur: जिल्ह्यात गत चार-पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत असून कोरोनामुक्त होणा-यांची संख्या वाढत आहे. 24 तासात जिल्ह्यात 529 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 58 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर सोमवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. ( Chandrapur Covid Cases Today )
हे देखील वाचा:
|PUBG साठी त्याने स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाची केली हत्या, आईसह तिघा भावंडांची केली हत्या!
Chandrapur Covid Cases:
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 34, चंद्रपूर 9, बल्लारपूर 2, भद्रावती 2, ब्रह्मपुरी 2, मुल 2, राजुरा 3, वरोरा 2, कोरपना येथे 2 रुग्ण आढळून आले असून नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये मुल येथील एका पुरुषाचा समावेश आहे.