पुनर्वसित मौजा सिनाळा हे गाव "महसुली गाव" म्हणून घोषित |
चंद्रपूर ( Chandrapur ) | महसूल व वन विभागाच्या शासकीय अधिसूचना दि. 1 जुलै 1976 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41) अन्वये कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. त्या अधिकाराचा वापर करून नवीन सिनाळा ( Sinala ) तह.चंद्रपूर या महसूल गावाचे मौजा दुर्गापूर येथील सर्वे क्रमांक 12 ते 17 व 73 व 74 चा भाग व रस्त्यामध्ये पुनर्वसन केलेल्या गावाला महसुली गावाचा ( Revenue Village ) दर्जा देण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ( Ajay Gulhane ) यांनी अंतिम अधिसूचना काढली आहे.
त्याद्वारे दि. 24 जानेवारी 2022 पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या, चंद्रपूर तालुक्यातील पुनर्वसित सिनाळा, मसाळा जुना, नवेगाव या गावाचे निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व चंद्रपूर जिल्ह्याच्या ,चंद्रपूर तालुक्यातील नवीन सिनाळा ( Sinala ) नावाने ओळखण्यात येणाऱ्या महसुली गावात ( Revenue Village ) रुपांतर करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.