विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक |
आरमोरी:- दि.०४/०२/२०२२ रोजी फिर्यादी हयांनी पोलीस स्टेशन आरमोरी येथे येउन लेखी फिर्याद दिली की , आरोपी नामे श्री संजय तोताराम शेळके , लेखापाल , पाणीपुरवठा विभाग नगरपरीषद आरमोरी हे फिर्यादीचे ऑफीसचे कॅबिनमध्ये जाउन तिला एकटे बघुन व आजुबाजुला कोणीही नसल्याचे संधी साधुन दिनांक ०२/०२/२०२२ रोजी फिर्यादीला एकाएकी मागुन पकडून तुला सोडणार नाही. तिचेवर बळजोरी करुन तिचे चुंबन घेउन तिचा विनयभंग केला व फिर्यादीचे शासकीय कामामध्ये व्यत्यय आणुन तिला तिचे शासकीय काम करण्यास अडथळा निर्माण केले. ( Accused of molestation arrested )
हे देखील वाचा:
|ब्रह्मपुरी | गावातील युवकाचा अल्पवयीन युवतीवर अत्याचार
अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्टवरून आरोपी विरुध्द भा.दं.वि. कायदयान्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला आहे . माननिय प्रणिल गिल्डा , उप विभागीय पोलीस अधिकारी , गडचिरोली यांचे मार्गदर्शनात गुन्हयाचा पुढील तपास सफौ / १२६५ देवराव कोडापे हे करीत आहेत . सदर गुन्हयात आरोपीचा शोध घेउन आरोपीस अटक करण्यात आली.