'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रह्मपुरी | गावातील युवकाचा अल्पवयीन युवतीवर अत्याचार - Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Crime,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,Bramhapuri News,Chandrapur New
गावातील युवकाचा अल्पवयीन युवतीवर अत्याचार

ब्रह्मपुरी
:  ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निलज (रुई) येथील एका बावीस वर्षीय युवकाने घराशेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना दिनांक ३१ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून फिर्यादी युवतीने ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आशिष घनश्याम राऊत वय (२०) रा. निलज याला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. ( Atrocities on a minor girl by a village youth

हे देखील वाचा:

आत्महत्या | तुम्ही माझे लग्न गरीब घरात का केले ? असा प्रश्न विचारत नैराश्यग्रस्त मुलीची आत्महत्या, आत्महत्येचे कारण स्पष्ट

निलज येथील आरोपी आशिष घनश्‍याम राऊत याचे घराशेजारी राहणाऱ्या युवती सोबत बऱ्याच दिवसापासून फेसबुक संदेश्या वरून बोलणे सुरू होते याचाच फायदा घेत आरोपीने युवकाने फिर्यादी युवतीला ३१ जानेवारीच्या रात्री निलज येथीलच मंदिराच्या आवारात बोलावले असता फिर्यादी युवती आरोपी युवकाला भेटण्यासाठी गेली.

आज जशी भेटायला आलीस त्याचप्रमाणे उद्या पण भेटायला येशील अशी बळजबरी करू लागला नाही तर या सर्व प्रकरणाची माहिती तुझ्या आई-वडिलांना देतो म्हणून धमकावीत दुसऱ्या दिवशी बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला हा सर्व घटनेचा प्रकार फिर्यादी युवतीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर २ फेब्रुवारी २०२२ रोजी आरोपी आशिष घनश्याम राऊत वय (२०) याच्या विरोधात ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६,३७६/३, ३५४,अ,पोक्षाचे कलम ४आणी ८ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

त्यानुसार आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे पुढील घटनेचा तपास ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×