Chandrapur Covid Cases: चंद्रपूरात आज पुन्हा कोरोनामुळे 2 मृत्यु; आजचा कोरोना आकडा जाणून घ्या - Batmi Expres

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Corona,Omicron News,Chandrapur Corona News,Chandrapur Corona Live,Maharashtra,Omycron,Chandrapur Lockdown News
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Corona,Omicron News,Chandrapur Corona News,Chandrapur Corona Live,Maharashtra,Omycron,Chandrapur Lockdown News,Chandrapur Corona Cases,

Chandrapur Covid Cases:  जिल्ह्यात गत 24 तासात जिल्ह्यात 392 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 121 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर शनिवारी जिल्ह्यात दोन बाधिताचा मृत्यू झाला आहे. Chandrapur Covid Cases Today )

हे देखील वाचा:

ब्रह्मपुरी | गावातील युवकाचा अल्पवयीन युवतीवर अत्याचार

Chandrapur Covid Cases: आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 35, चंद्रपूर 12, बल्लारपूर 7, भद्रावती 14, ब्रह्मपुरी 7, सिंदेवाही 4, मुल 3, सावली 6, पोंभूर्णा 3, गोंडपिपरी 4, राजुरा 5, चिमूर 8, वरोरा 11, कोरपना येथे 2 रुग्ण आढळून आले असून नागभीड, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर येथील दोन पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 315 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 95 हजार 581 झाली आहे. सध्या 1179 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 51 हजार 554 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 51 हजार 461 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1555 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन:- नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.